नॅशनल बुक ट्रस्ट, भारत सरकार (NBT) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील “नागपूर पुस्तक महोत्सव – 2025” या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने, दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे (भा.प्र.से.) यांची भेट घेऊन पुस्तक महोत्सवाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षक यांच्या या महोत्सवातील सक्रिय सहभागाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, या भव्य आयोजनाच्या यशस्वितेसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड ,डॉ. देवेंद्र भोंगाडे, श्री. अजय चव्हाण, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मेधा कानेटकर, विद्यापीठ ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. विजय खंडाळ, वित्त अधिकारी श्री. हरीश पालीवाल, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संभाजी भोसले, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, डॉ. अभय देशमुख तसेच श्री. केतन मोहितकर उपस्थित होते.
नॅशनल बुक ट्रस्ट, भारत सरकार (NBT) आयोजित राष्ट्रीय स्तरावरील “नागपूर पुस्तक महोत्सव – 2025” या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने, दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री मा. ना. श्री. पंकज भोयर यांची भेट घेऊन पुस्तक महोत्सवाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी विदर्भातील शालेय विद्यार्थी व शिक्षक यांच्या या महोत्सवातील सक्रिय सहभागाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, या भव्य आयोजनाच्या यशस्वितेसाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी झिरो माईल युथ फाउंडेशन तर्फे डॉ. समय बनसोड व श्री. कल्याण देशपांडे उपस्थित होते.
आगामी २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राष्ट्रीय पुस्तक न्यास (भारत सरकार) द्वारे आयोजित “नागपूर पुस्तक महोत्सव – 2025” यशस्वी करण्याच्या दृष्टीने स्वयंसेवक(Volunteer) नोंदणीला प्रारंभ झाला आहे. या अनुषंगाने आज स्वयंसेवकांसाठीच्या (Volunteer) पोस्टरचे अनावरण एनसीसी २० महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विकास शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मंचावर श्री. दीपक खिरवडकर (माजी संचालक, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र), श्री. आशुतोष अडोनी (प्रसिद्ध वक्ते व राष्ट्रीय महामंत्री, संस्कारभारती), डॉ. शेरील पडोळे (अध्यक्ष, वनवासी कल्याण आश्रम नागपूर शहर), श्री. ब्रजेश मानस (प्रचार विभाग प्रमुख, रा. स्व. संघ, नागपूर महानगर), डॉ. अभय मुदगल (प्राचार्य, व्हीएमव्ही महाविद्यालय नागपूर), श्री. प्रशांत कुकडे, डॉ. समय बनसोड व श्री. कल्याण देशपांडे (संचालक, झीरो माइल युथ फाउंडेशन) उपस्थित होते.
या पोस्टरद्वारे तरुणाईला महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे व वाचकांसोबत कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. “नागपूर पुस्तक महोत्सव – २०२५” या माध्यमातून शहरातील वाचक, लेखक, प्रकाशक, विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी तसेच स्वयंसेवक यांना एक अद्वितीय व्यासपीठ लाभणार आहे.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात स्वयंसेवकांची (Volunteer) भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत. इच्छुक स्वयंसेवकांनी (Volunteer) नोंदणी व अधिक माहितीसाठी www.nagpurbookfestival.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा पोस्टरवरील QR कोड स्कॅन करावा.
नॅशनल बुक ट्रस्ट, भारत सरकार द्वारा दिनांक 22 ते 30 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील "नागपूर पुस्तक महोत्सव – 2025" या भव्यदिव्य सोहळ्याच्या पोस्टरचे आज महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते आज दिनांक 28 जून 2025 रोजी विमोचन करण्यात आले. नागपूर मधील रेशिमबाग मैदान येथे होणारे हे ऐतिहासिक आयोजन केवळ नागपूरकरांसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य भारतातील पुस्तकप्रेमींसाठी एक पर्वणी ठरेल असा विश्वास मा. श्री. देवेंद्रजी नी याप्रसंगी व्यक्त केला. तसेच त्यांनी या आयोजनाच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी झिरो माईल युथ फाउंडेशन तर्फे प्रशांत कुकडे , समय बनसोड , कल्याण देशपांडे उपस्थित होते.
आगामी २२ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान राष्ट्रीय पुस्तक न्यास (भारत सरकार) आयोजित “नागपूर पुस्तक महोत्सव – 2025” यशस्वी करण्यासाठी शीर्षक गीत लेखन स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण प्रसिद्ध वक्ते व भाजपा नागपूर शहराध्यक्ष मा. दयाशंकरजी तिवारी यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. देवेंद्र भोंगाडे, श्री. प्रथमेश फुलेकर व झीरो माईल युथ फाउंडेशनचे संचालक श्री. प्रशांत कुकडे, डॉ. समय बनसोड, श्री. कल्याण देशपांडे उपस्थित होते.
स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असून गीत मराठी किंवा हिंदी भाषेत १२ ते १६ ओळींचे असावे. अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५ असून, नोंदणीसाठी www.nagpurbookfestival.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. महोत्सव समितीने साहित्यिक व सांस्कृतिक रस असलेल्या नागरिकांना उत्साहाने भाग घेण्याचे आवाहन केले आहे.